पल्स पोलिओ मोहिम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे
राजीव जाधव यांचे मत
रत्नागिरी : दिनांक बुधवार, ०९ जानेवारी, २०१३ देशातून पोलिओचा समूळ नायनाट करण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजून नागरिकांनी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र खंडागळे, निवासी वैद्यकिय अधिकारी दिलीप मोरे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हेलन्स आरोग्य अधिकारी डॉ.शिरीष काटकर आदी उपस्थित होते.
श्री.जाधव म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून राज्यात एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही. देशातही 2011 मध्ये केवळ एकच रुग्ण आढळला होता. सतत तीन वर्षे एकही पोलिओ रुग्ण आढळून न आल्यास देश पोलिओमुक्त होणार असल्याने नागरिकांनी 20 जानेवारी आणि 24 फेब्रुवारी रोजी बालकांना बुथवर जाऊन पोलिओचा डोस पाजावा, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील एकूण 1 लाख 15 हजार 836 बालकांना लसीकरणासाठी 1904 केंद्र, 52 टँझिट टीम आणि 97 मोबाईल टीमचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेसोबतच 22 ते 24 जानेवारी आणि 26 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत घरोघरी भेटी देऊन राहिलेल्या बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. गेल्या 18 वर्षात ही मोहिम उत्तमरित्या राबविण्यात येत असल्याने पोलिओ रुग्णांची संख्या शुन्यावर आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. शेवटचा पोलिओ रुग्ण 13 जानेवारी 2011 मध्ये हावडा येथे आढळला असल्याने जानेवारी 2014 पर्यंत रुग्ण न आढळल्यास भारत पोलिओ मुक्त होऊ शकेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
No comments:
Post a Comment