पोलीस बँडच्या धूनवर `रेझींग डे` चा समारोप
रत्नागिरी : पोलीस बँडच्या सुमधूर सुरावटीच्या साथीने पोलीस विभागातर्फे आयोजित `रेझींग डे` कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत,नगराध्यक्ष मिलिंद कीर,पोलीस अधीक्षक दीपक पांडे, उपअधिक्षक संजीव मोरे, रझ्झाक काझी आदी उपस्थित होते.
देशाचे पहिले पंतप्रधान कै.पं.जवाहरलाल नेहरु यांनी 2जानेवारी रोजी वर्तमान ध्वज महाराष्ट्र पोलीसांच्या स्वाधीन केला. या दिवसाचे औचित्य साधून पोलीस दलातर्फे `रेझींग डे` (स्थापना दिवस) साजरा करण्याची सुरूवात यावर्षी 2 जानेवारी पासून करण्यात आली. यानिमित्ताने पोलीस विभागातर्फे नागरिकांसाठी विविध विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप रत्नागिरीतील मारुती मंदिर परिसरात पोलीस बँड पथकाच्या सुमधूर संगीताने झाला.
बँड पथकाने गर्जा महाराष्ट्र माझा, जयोस्तुते, सारे जहाँ से अच्छा अशा देशभक्तीपर गीतांबरोबरच मराठी-हिंदी चित्रपटाच्या लोकप्रिय धून वाजवून उपस्थितांचे मनोरंजन केले.पोलीस परेडच्या वैशिष्ट्यपूर्ण धूनने नागरिकांचे लक्ष आकर्षित केले. पोलीस आणि नागरिकात सहकार्याचे नाते निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी श्री.पांडे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment