अकोला: होळी साजरी करताना
त्यासोबत आपल्या पारंपारिक रूढी आणि संकल्पनाही जुळल्या आहेत. मग ते होळी पेटवणं असो की
होळीला दाखवला जाणारा नैवैद्य असो. श्रद्धा म्हणून होळीला पुरणपोळीचा नैवद्य दाखवण्याची
परंपरा महाराष्ट्रात पूर्वीपासून सुरु आहे. मात्र हीच बाब अकोल्यात गणित शिक्षक
असणाऱ्या गणेश कावरे यांना खटकत होती. त्यांनी ही सल आपल्या सहकारी मित्रांकडे
बोलून दाखवली आणि इथूनच श्रीगणेशा झाला एका अभिनव लोकचळवळीचा.
पुरणपोळी होळीत जाळण्याऐवजी गरीब, मजूर, भिकारी आणि वंचितांना वाटण्यासाठी त्यांच्याकडे जमा करण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं. आधी त्यांच्या या संकल्पनेला विरोधही झाला. मात्र हळूहळू त्यांच्या या उपक्रमात त्यांच्या विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक आणि समाजातील इतरही सहभागी व्हायला लागले आहेत.
कावरे गुरुजींच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर आपापल्या भागातही ही चळवळ सुरु केली आहे. चौदा वर्षांपूर्वी अकोल्यात सुरु झालेला हा उपक्रम आता राज्याच्या सीमा ओलांडत मध्यप्रदेश, कर्नाटक आंध्रप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांतील काही भागात सुरु झाला आहे
कावरे गुरुजींनी उदात्त विचार घेऊन सुरु केलेल्या या उपक्रमाला आता लोकचळवळीचं रुप प्राप्त होत आहे. गुरुजींनी सांगितलेल्या उपक्रमातून या विचाराशी जुळलेल्या अनेक घरांतील पुरणपोळी आता होळीत जळण्याऐवजी अनेक गरीब लोकांच्या पोटाची आग शमवण्याच्या कामी येत आहे. या उपक्रमात आज एकट्या अकोला शहरातून सहा हजारांवर पुरणपोळ्या गरिबांना वाटल्या गेल्या.
सुभाष शहा यांनीही मागच्या वर्षापासून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला आहे. मागच्या वर्षी अकरा पुरणपोळ्या देणाऱ्या सुभाष काकांनी यावर्षी
मात्र एकवीस पोळ्या या उपक्रमात दिल्या आहेत. होळीच्या दिवशी या पुरणपोळीचा गोडवा झोपडीत राहणारे गरीब, मजूर, भिकारी आणि इतर वंचितांना चाखायला मिळतो.
भाकरीच्या चंद्रात आयुष्य शोधणाऱ्या या लोकांची समाधानाचा ढेकरच या उपक्रमाचं यश सांगून जात आहे.
'वितभर' समाजसेवेला 'हातभर' दाखवणारे अनेक महाभाग असतात. मात्र कावरे गुरुजींचा आदर्शवाद आणि अस्वस्थतेला त्यांनी वास्तवाची जोड दिली आहे. जाळण्यापेक्षा भुकेल्याच्या पोटाची आग 'शांत' करण्याचा मंत्र देणारी त्यांची ही चळवळ निश्चितच प्रेरणादायी अशीच
म्हणावी लागेल.