पत्रकारितेतील नवी आव्हाने स्विकारण्यास सज्ज रहाव
उपसंचालक वसंत शिर्के
सिंधुदुर्गनगरी : पत्रकारितेत सध्या झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे पत्रकार हा संगणक साक्षर, बहुआयामी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणारा असावा. पत्रकारितेतील ही नवी आव्हाने स्विकारण्यास सज्ज रहा, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक वसंत शिर्के यांनी व्यक्त केले.
कुडाळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने कै.ग.म.तथा भैय्यासाहेब वालावलकर व कै.वसंत दळवी पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन कुडाळ तालुक्यातील वालावल येथे करण्यात आले होते. त्यावेळी श्री.शिर्के बोलत होते. वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर, गटविकास अधिकारी आर.के.जोशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, साप्ताहिक व्याधच्या संपादक संजिविनी देसाई, वालावलच्या सरपंच पल्लवी केळुस्कर, कुडाळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पालकर हे उपस्थित होते.
श्री.शिर्के म्हणाले, सध्या पत्रकारिता ही अत्यंत झपाट्याने बदलत आहे. इंग्रजी भाषा बोलता येणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यामुळे पत्रकारांनी आपले विश्व व्यापक बनवावे, बदलत्या काळाबरोबर आपल्यालाही बदलत ठेवले तर काळाची आव्हाने सहजरित्या सर्वांना पेलता येतील. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर आज अनेक क्षेत्रात संधी आहेत. रेडीओ एफएम, जनसंपर्क या क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी आजच्या पिढीने हे बदल अवगत करावेत. या अवगत केलेल्या बदलांचा आजच्या पत्रकारितेला लाभच होणार आहे. श्री.शिर्के यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आठवणींना आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या साक्षीने उजाळा दिला. त्यांनी भैय्यासाहेब वालावलकर यांच्याही काही आठवणी सांगितल्या.
गंगराम गवाणकर यांनी वस्त्रहरण नाटकाची नवीन आवृत्ती लवकरच महापुरूष या नावाने तयार होणार असल्याचे सांगितले. आर.के.जोशी यांनी पत्रकारिता कशी असावी याचे सविस्तर विवेचन करून जिल्ह्यातील पत्रकारिता शासनासाठी कशा प्रकारे महत्वाची आहे ते सांगितले. या कार्यक्रमात पत्रकारिता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.

No comments:
Post a Comment