आदिवासी बांधवांनी ज्ञान आत्मसात करावे - बबनराव पाचपुते
ठाणे : ज्ञान हे जगातील सर्वात मोठे भांडवल असून आदिवासी बांधवांनी ते आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुरबाड येथे केले.
मुरबाड तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर अंतर्गत माळ येथील शासकीय आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे भूमिपुजन, मोरोशी येथील आश्रमशाळेच्या नुतन इमारतीची पायाभरणी, धसई भुईपाडा रस्त्याचे भूमिपुजन, सिंगापूर व बनाचीवाडी येथे आदिवासी विभागामार्फत ठक्करबाप्पा योजनेंतर्गत समाजमंदिराचे उद्घाटन श्री.पाचपुते यांच्या हस्ते झाले. आदिवासी बांधवांना त्यांच्या हस्ते ब्लँकेट, सतरंजी व स्प्रे पंपाचेही वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार किसन कथोरे, स्थानिक लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुधीर पाटील आदी उपस्थितहोते.
आदिवासींच्या संरक्षणासाठी आदिवासी विकास विभाग विविध योजना राबवित असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. महिलांनी बचतगट तयार करून आपल्या परिसरातील विविध वनस्पतीपासून मिळणारी उत्पादने तयार करून बाजारात आणली पाहिजेत, त्या माध्यमातून आपले जीवनमान उंचावले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उत्तम दर्जाच्या शाळा बांधल्या जाणार आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची सोय, उत्तम प्रकारचे जेवण, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना राहण्याच्या सोयीसह अधिकाधिक सुविधा देणार असल्याचेही पाचपुते म्हणाले. आपल्या शेतामध्ये चांगल्या बी-बियाणांचा वापर करून चांगले उत्पन्न घ्यावे, असेही आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभाग विविध योजना राबवित असल्याचे ते म्हणाले.

No comments:
Post a Comment