Friday, 14 December 2012

सदृढ बाळाच्या जन्मासाठी गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक

रत्नागिरी : सुदृढ बाळ जन्माला येण्यासाठी मातांचे योग्य पोषण आवश्यक असून त्यासाठी  गरोदर मातांच्या आरोग्याची आणि प्रकृतीची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा जाधव यांनी केले.

राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानांतर्गत कै.शामराव पेजे सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, बांधकाम सभापती दत्ताजी कदम, शिक्षण व अर्थ सभापती विजय सालिम, समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, चिपळूणचे सभापती सुरेश खापले, महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र खंडागळे आदी उपस्थित होते.

श्रीमती जाधव म्हणाल्या, बालपण जीवनातील महत्वाचा टप्पा असून त्यामध्ये बालकांची योग्य काळजी घेतल्यास कुपोषणाचा प्रश्नच उद्भवणार नाही. यासाठी गरोदर मातांपासून कुटुंबातील सर्वांना याविषयी जागरूक करण्याची गरज आहे. बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी प्रयत्न करावे.


No comments:

Post a Comment